वर्ध्यातील घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला अटक

घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश

वर्धा | मागिल काही दिवसात वर्धा शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे पोलिसांच्या नाकीनऊ आले. मात्र वर्धा शहरात सात ठिकाणी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यास वर्धा पोलिसांनी यश संपादन केले आहे. या चोरीच्या घटनांमधील चार चोरट्यांना अटक करण्यात आली आहे.

या चोरांचे नाव रामा किसन देऊळकर, किसना रमेश राऊत, राजू रामा दांडेकर, मंगेश बाबुलाल गुंजेवार असे आहे. हे सर्व रा.वडार झोपडपट्टी टेकडी सावंगी येथील आहेत. या चोरट्यांनी वर्धा शहरात सात ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 21 ग्रॅम सोन 110 ग्रॅम चांदी व काही नगदी रूपये जप्त केले. या चोरट्यांच्या टोळीकडून अधिक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies