मुंबई । भारतात येत्या 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरूवात होत असून, मंगळवारी पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटमधून 'कोव्हिशिल्ड' लसीचा पुरवठा देशातील विविध भागात पाठवण्यात आला. कोरोना बहुप्रतिक्षित लसीचा पहिला साठा राज्याची राजधानी मुंबईत पोहोचला आहे. कोव्हिशिल्ड लसीचे 1 लाख 39 हजार 500 डोस आज पहाटे साडेपाच वाजता मुंबई पाठवण्यात आले असून, हा साठा पालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
संपुर्ण देशासह राज्यातही कोरोना लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरूवात होणार असून, त्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार राज्यामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार 18 वर्षांखालील व्यक्तींना तसेच गरोदर महिलांना सोबतच एँलर्जी असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार राज्यामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार १८ वर्षांखालील व्यक्ती, गरोदर महीला, तसेच कोणत्याही ऍलर्जी असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. @rajeshtope11 यांनी दिली आहे. pic.twitter.com/2mAk8GQDv1
— NCP (@NCPspeaks) January 13, 2021