विधानसभा अध्यक्षपद एका वर्षात राजीनामा देण्यासाठी नव्हतं, 'सामना'तून काँग्रेसवर निशाणा

शिवेसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून विधानसभा अध्यक्षपदाबाबत भाष्य करण्यात आले आहे.

मुंबई । राज्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आलं आहे. पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीतील अनेक नेतेमंडळी नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे.'काँग्रेसला विधानसभेचं अध्यक्षपद पाच वर्षांसाठी दिलं होतं. फक्त एका वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही.' अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून राज्यातील राजकीय घडामोंडीवर भाष्य करण्यात आले आहे.

'काँग्रेसने त्यांच्या पक्षांतर्गत बदल केला आहे. हा त्यांचा अधिकार आहे, पण सरकार, विधानसभा,बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही, यासाठी सावधान राहावे लागेल.' असे अग्रलेखात म्हटलं आहे. 'विधानसभा अध्यक्षपद महाविकास आघाडी स्थापन करण्यावेळी काँग्रेसच्या वाट्याला गेले खरे. पण त्या बदल्यात शिवसेनेने आपल्या कोट्यातील एक मंत्रीपद राष्ट्रवादीला दिले. आता शरद पवारांचे म्हणणे आहे की, विधानसभा अध्यक्षपदाचे काय करावे? यावर आता तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेतील. पवारांच्या भुमिकेत नक्कीच दम आहे. काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद पाच वर्षासाठी देण्यात आले होते. फक्त एक वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही. ते कसेही असले तरी आता यातून मार्ग काढावं लागेल. म्हणजे पवारांच्या मनात नेमकं काय विचार घोळत आहेत ते पाहावे लागेल' असे सामानात म्हटलं आहेAM News Developed by Kalavati Technologies