यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या पार

शुक्रवारी जिल्ह्यात 121 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने जिल्ह्यात हजारचा आकडा पार केला आहे.

यवतमाळ | जिल्ह्यात आतापर्यंत दुहेरी अंकात वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शुक्रवारी अचानाक तीन अंकात वाढली. ही आतापर्यंत एका दिवसात झालेली सर्वात मोठी वाढ आहे. आज (दि.31) रोजी जिल्ह्यात तब्बल 121 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने जिल्ह्यात हजारचा आकडा पार केला आहे. तर आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 31 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आज नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 121 जणांमध्ये 66 पुरुष व 55 महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक 50 रुग्ण पुसदचे, 44 रुग्ण दिग्रसचे, पांढरकवडा येथील 20 रुग्ण, यवतमाळचे सहा तर एक रुग्ण दारव्हा येथील आहे.

जिल्ह्यात गुरवारपर्यंत 361 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण होते. यात शुक्रवारी 121 नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 482 वर पोहचला. मात्र 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 31 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 451 आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 1074 झाली आहे. यापैकी 596 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 27 मृत्युची नोंद आहे.AM News Developed by Kalavati Technologies