तुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना

हत्या करण्यात आलेल्या कुख्यात गुंडाचे नाव महेश मनसाराम हजारे आहे

भंडारा | जिल्ह्यातील तूमसर येथे वेगवेगळ्या घटनांमध्ये आरोपी असलेल्या गुंडाची हत्या करुन मृतदेह नहरात फेकल्याची घटना घडली आहे. सदर घटना तुमसर शहारातील कोष्टी मार्गावर घडली असून शुक्रवारच्या सकाळी 9:30 दरम्यान उघडकीस आली.

हत्या करण्यात आलेल्या कुख्यात गुंडाचे नाव महेश मनसाराम हजारे(30) राहणार जुना शहरवार्ड (आझाद नगर) तुमसर असे आहे. त्यात मारेकरी कोण व किती याची अद्दाप माहिती पोलिसांनाही नाही. मात्र सदर हत्येमुळे तुमसर शहारात पुन्हा गुन्हेगारी हालचाली वाढल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतकावर तुमसर शहरातील चो-यांसह 3 मणूष्य वधाच्या कलमाअंतर्गत गुन्ह्यांची नोंद होती. त्यात हत्येच्या एका गुन्ह्यात त्याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. सध्या मृतक एका हत्येच्या गुन्ह्यात जमीनावर बाहेर आलेला होता हे विशेष.

तुमसर-कोष्टी मार्गावरील शेतशिवारात शुक्रवारच्या सकाळी पादचारींना नहरात मृतदेह असल्याचे दिसुन आले. तोच रक्तबंभाळ महेशच्या हत्येची माहिती 9:30 च्या सुमारास वा-यासारखी शहरभर पसरली. घटनास्थळाच्या दिशेने स्थानिकांनी धाव घेतली. तुमसर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळावर पोलिस दाखल झाले. पंचनाम्याची प्रक्रिया पार पाडतांना मृतक महेश हजारेच असल्याचे निष्पन्न झाले. मृतकाच्या पोटावर, मानेवर व डोक्यावर धारदार शत्र्याच्या वार पोलिसांना दिसून आले. मात्र घटनास्थळावर अतिरक्तस्त्रावाचे पुरावे आढळले नाही. त्यामूळेच तुमसर पोलिस स्टेशनचे निरिक्षक मनोज सिडाम यांच्यामते मृतक महेशला इतरत्र मारून मृतदेह नहरात फेकल्याचा शंसय व्यक्त केला जात आहे. येथे अद्दाप घटनास्थळासह आरोपीही अज्ञात असल्याने हत्येची तिढा वाढतांना दिसत आहे. मात्र मृतकाची गुन्हेगारी पार्श्वभुमी असल्याने एखाद्या परिचित वै-यानेच महेशचा काटा काढला असावा असा प्राथमिक शंसय पोलिस व्यक्त करत आहेत.

हत्येच्या घटनेची नोंद तुमसर पोलिसांनी केली आहे. पंचनान्याचे सोपस्कार पार पाडून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले आहे. येथे मृतकचा भाऊ विष्णु मनसाराम हजारे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. सदर हत्येचे तपास स्वत: पोलिस निरिक्षक सिडाम करत आहेत. लवकरच घटनेमागील आरोपींना अटक करण्यात येण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.AM News Developed by Kalavati Technologies