99 वर्षाच्या आजीवर आली उपोषणाला बसण्याची वेळ, वारसाला नोकरी मिळावी म्हणून करत आहे संघर्ष

कुटुंबातील वारसाला नोकरीत समावून घेण्याबाबत गत 19 वर्षापासून मागणी करत आहेत

यवतमाळ । कधी काळी दिग्रस नगर पालिकेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून संपूर्ण आयुष्य घालविलेल्या 99 वर्षाच्या केशरबाई रामनाथ सोनवाल या सेवानिवृत्त आणि वयोवृद्ध महिलेवर उपोषणाची वेळ आली आहे. वारसा हक्काने आपल्या कुटुंबातील व्यक्तीला नगर पालिकेत नोकरी मिळावी म्हणून त्या मागील 19 वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. अखेर आपल्या मागणीसाठी त्यांनी नगर पालिके समोर उपोषण सुरू केले आहे. लक्षणीय आहे की 26 डिसेंबर रोजी त्या दुसऱ्यांदा उपोषणाला बसल्या होत्या. त्यावेळेस अधिकारी आणि नगरसेवक यांनी आश्वासन देऊन उपोषण सोडविले होते.

त्यांच्या कुटुंबातील वारसाला नोकरीत समावून घेण्याबाबत गत 19 वर्षापासून मागणी करत आहेत. एकोणीस वर्षांपूर्वी त्यांनी पहिल्यांदा याबाबत नगरपालिका कार्यालयाला पत्र दिले होते. परंतु, अद्याप पर्यंत यांचे मागणी पूर्ण झाली नाही. सुरुवातीला केशरबाई यांच्या वारसाला नोकरीत घेण्यात आले होते. परंतु तो अचानकपणे बेपत्ता झाल्याने सदर पद रिक्त होते. यावर सोनवाल कुटुंबियांचा सदस्य घेणे अभिप्रेत आहे असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. या आधारावर त्यांनी आपली मागणी केली आहे. दरम्यान 26 डिसेंबर रोजी केशरबाई या सहकुटुंब उपोषणाला बसल्या होत्या. तेहा नगरपालिकेचे अधिकारी आणि संचालकांनी लवकरच यावर निर्णय घेऊ असे म्हणून आंदोलन सोडविले होते. त्यानंतर सोनवाल कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे जाऊन जिल्हाधिकाऱ्याची भेट घेऊन आपली अडचण त्यांच्या समक्ष ठेवले यावर लवकरच सकारात्मक कार्यवाही करू असे आश्‍वासन जिल्हाधिकारी यांनी दिले होते. यानंतरही काही मार्ग न निघाल्याने अखेर 99 वर्षाच्या केशरबाई सोनवाल परत एकदा उपोषणाला बसल्या आहे. दोन दिवसांमध्ये यावर योग्य निर्णय झाला नाही तर 17 जानेवारी रोजी मुख्याधिकारी कार्यालयांमध्ये आत्मदहन करू असा इशारा दिला आहे. याबाबत मात्र नगरपालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचं मत व्यक्त करण्यात आलं नाही.AM News Developed by Kalavati Technologies