टेक्स्टाईल पार्ककडून महिला कामगारांचे आर्थिक शोषण, महिलांनी माजी आमदारासमोर मांडल्या‌ व्यथा

महिला कामगारांनी माजी आमदार राजू तिमांडे यांची भेट घेत त्यांच्या समस्या मांडल्या.

वर्धा | हिंगणघाट शहरालगत असलेल्या बेला येथिल इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क मधील श्याम बाबा गारमेंट्स कंपनीमध्ये कामगारांना नियमाप्रमाणे कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. त्यांचे आर्थिक शोषण होत असल्याच्या समस्या घेऊन टेक्सटाइल पार्क येथील महिला कामगारांनी माजी आमदार राजू तिमांडे यांची भेट घेत त्यांच्या समस्या मांडल्या.

महाराष्ट्र सरकारचा या टेक्स्टाईल पार्कला परवानगी देताना स्थानिक लोकांच्या हाताला काम मिळावे हेतू होता. या टेक्स्टाईल पार्कमध्ये गिमा टेक्स जिनिंग अँड प्रेसिंग, एस.बी.टीचा गारमेंट बनवण्याचा कारखाना सुरू आहे. एस.बी.टी रेडिमेट कपडे बनविण्याचा कारखान्यांत 200 ते 250 महिला काम करतात. त्यात महिलांना 5 ते 6 महिने गारमेंट्स बनविण्याचे ट्रेनिंग विनामूल्य देण्यात आले. त्यानंतर कंपनी सुरू केल्यानंतर 1 वर्ष सर्व महिला कामगारांना 50/- रूपये प्रति दिवस प्रमाणे पगार दिला. दुसर्‍या वर्षाला 200/- रुपये प्रति दिवस प्रमाणे पगार सुरू आहे. कंपनी अॅक्टप्रमाणे मिनिमम वेजेस आणि इतर सुख सुविधा दिल्या जात नाही. अशाप्रकारे महिला कामगारांचे आर्थिक शोषण सुरू आहे. असा आरोप महिला कामगारांकडून केला जात आहे. या वेळी माजी आमदार राजू तिमांडे यांनी कामगार महिलांना सोबत घेऊन व्यवस्थापनाशी चर्चा करून महिला कामगारांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला देण्याची मागणी केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies