अहमदनगर | नेवासा तालुक्यातील सोनई येथे 100 पैकी 100 पैकी गुण मिळवणे जेवढे अवघड त्यापेक्षा सर्व विषयात 35 गुण मिळवणे म्हणजे एक दिव्यच. पण हेच दिव्य सोनई (ता. नेवासा) येथील एका पठ्याने साध्य केले आहे. त्याने दहावी बोर्डाच्या परीक्षेत मराठी असो वा इंग्लिश किंवा गणित असो वा विज्ञान सर्व विषयात 35 गुण मिळवून परफेटक्ट 35 गुणांचा मान मिळवलाय
बुधवार ( ता. 29) रोजी दहावीचे निकाल जाहीर झाले. कोणी 100 टक्के गुण मिळवले तर कोणी काठावर पास झाले. मात्र तेजस विठ्ठल वाघ (रा. हनुमानवादी, सोनई) या विद्यार्थ्याने सर्व विषयात 35 टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झाला आहे. तेजस वाघ हा मुळा एज्युकेशन सोसायटीचे सोनई येथील श्री. शनिश्वर माध्यमिक विद्यालयात दहावीचा विद्यार्थी आहे. त्याच्या परफेटक्ट 35 ची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. तेजसचे विद्यालयाचे प्राचार्य डी. आर. सोनवणे, माजी प्राचार्य शशिकांत लिपाने यांनी अभिनंदन केले. दरम्यान तेजसचा हनुमानवाडी ग्रामस्थांच्या वतीने ज्येष्ठ नेते सुभाष राख यांच्या हस्ते व अभिजित राख, वैभव वाघ, राहुल राख यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. त्याच्या अनेक मित्रांनी त्याच्यासह गुणपत्राचा फोटो व्हाट्सएप, स्टेटस, फेसबुक व्हायरल करून कौतुक केले.