बुलडाण्यात पोलिस आणि ईपीएस पेंशनधारकांमध्ये बाचाबाची

पेंशनधारकाना हटविण्याससाठी पोलिसांनी बळाचा वापर करीत पेंशनधारकांना लोटपाट करत आपसात भिडले

बुलडाणा । देशातील निमशासकीय पेंशनधारकाना पेंशनवाढ मिळावी यासाठी ईपीएस संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलयासमोर पेंशनधारकानी 318 दिवसांपासून साखळी उपोषण सुरु केले आहे. मात्र शासन या पेंशनधारकाकडे दुर्लक्ष करीत असल्याने आज पेंशनधारकानी रास्तारोको आंदोलन करीत रस्त्यावर झोपले. त्या पेंशनधारकाना हटविण्याससाठी पोलिसांनी बळाचा वापर करीत पेंशनधारकांना लोटपाट करत आपसात भिडले. ही घटना जिल्हाधिकारी कार्यलय व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कार्यल्यासमोर घडली असल्याने चांगलाच तणाव व गोंधळ निर्माण झाला होता चिडलेल्या पेंशनधारकानी पोलिसांना सुद्धा लोटपाट केली.AM News Developed by Kalavati Technologies