वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी एक दिवसाच्या उपोषणासह आत्मक्लेश

पुढं वेगवेगळ्या टप्प्यांत तीव्र आंदोलन केलं जाईल, आंदोलन समितीचा इशारा

वर्धा । वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं वर्ध्यात आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी एक दिवसाचा उपोषणही केलं. आंदोलनाच्या सुरूवातीला सेवाग्राम आश्रमात प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर वर्ध्यातील गांधीजींच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी स्वतंत्र विदर्भ करण्याची मागणी आंदोलकांनी केली. पुढं वेगवेगळ्या टप्प्यांत तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशारा स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं देण्यात आला.

आंदोलनात वामनराव चटप, सतीश दाणी, पांडुरंग भालशंकर आदी सहभागी होते. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं अनेक वर्षांपासून वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यात येत आहे. पण, अद्यापपर्यंत या मागणीला यश आलेलं नाही. आताही पुन्हा विदर्भ राज्य आंदोलन समितीनं आंदोलनाला सुरूवात केली आहे. टप्प्याटप्प्यात वेगवेगळ्या स्तरावर विदर्भाच्या मागणीचं आंदोलन केलं जाणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies