चंद्रपूरात तब्बल 60 दिवसानंतर धावली लालपरी; अटीशर्तीसह नागरिकांना प्रवासाची मुभा

नागरिकांना अटीशर्तीसह बस प्रवासाला मुभा

चंद्रपूर | कोरोनाच्या संकटात ठप्प होऊन बसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल दोन महिन्यांनी एसटी बसची चाकं फिरली. आजपासून जिल्ह्यांतर्गत बस सेवा सुरू झाली असून, अटीशर्तीसह बस प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. प्रवास करतांना नागरिकांनी गर्दी करू नये. बसस्थानकात केवळ पाच व्यक्ती जमा होतील, आसन संख्येच्या 50 टक्केच प्रवासी वाहतूक होईल, 65 वर्षांवरील ज्येष्ठांना आणि 10 वर्षांखालील मुलांना केवळ वैद्यकीय कारणांसाठी प्रवेश असणार आहे. तसेच गर्भवती आणि आजारी व्यक्तींना प्रवास करता येणार नाही, प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांनी मास्कचा वापर करणं बंधनकारक केलं आहे. अशा नियमांसह ही सेवा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान सेवा सुरू झाल्यानं आतापर्यंत बसची वाट बघणाऱ्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. चंद्रपूर बसस्थानकावर तसा शुकशुकाट बघायला मिळाला. केवळ तीन प्रवासी उपस्थित दिसले. बस पूर्णपणे सॅनिटायझेशन करण्यात आल्या असून, चालक-वाहक मास्क बांधून प्रवाशांची वाट बघताना दिसले. या बस जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच धावणार आहेत.AM News Developed by Kalavati Technologies