यवतमाळ । पोलिओ डोस देण्याऐवजी चिमुकल्यांना सॅनिटायझरचा डोस दिल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. पाच वर्षाखालील 12 चिमुकल्यांना सॅनिटायझर पाजण्यात आले असून, त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.
सध्या या 12 चिमुकल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेशी संबंधित तीन कर्मचारी, एक आरोग्य कर्मचारी, एका डॉक्टरासह आशा वर्कर्सला निलंबीत करण्यात आलं आहे. देशभरात पल्स पोलिओच्या लसीकरण मोहिमेला 31 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. मुलांना पोलिओ होऊ नये म्हणून दोन पोलिओचे दोन थेंब दिले जातात. 2 फेब्रुवारीपर्यंत देशभरात ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत मुलांना पोलिओ लस दिली जाते. 30 जानेवारीला राष्ट्रपती भवनामध्ये काही मुलांना पोलिओचे दोन थेंब देऊन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.