अमरावती । गेली कित्येक वर्षापासून अमरावती जिल्ह्यतील भातकुली तालुक्यातील तहसील कार्यालय हे अमरावती शहरात होते. भातकुली तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना तहसील कामासाठी वेळोवेळी अमरावती शहरात यावे लागत होते. तेव्हा जनतेच्या मागणीमुळे हे कार्यालय स्थानिक भातकुली शहरातच हलवण्याचे आदेश न्यायालयाने 25 तारखेला दिले. तरी पण प्रशासनाने याची दखल न घेता अजून पर्यंत कार्यालय अमरावती शहरातच ठेवले. त्यामुळे याची दखल घेत जनतेला होणारा त्रास लक्षात घेऊन आज शिवसैनिकांनी तहसील कार्यलयात राडा करत कर्यालयाला कुलूप ठोकले. शिवसेनेचा राडा पाहून आता प्रशासन कामाला लागले आहे.
अमरावती जिल्ह्यतील भातकुली तहसीलला शिवसैनिकांनी ठोकले कुलूप
तहसील कार्यालय भातकुलीला हलवण्याची मागणी
