तिळाच्या भावात 40 रुपये तर गुळाच्या भावात 14 रुपये दरवाढ

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी तिळ व गुळात मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली.

वर्धा | भारतीय संस्कृती महिलांकरीता महत्वाचा सण मानल्या जाणाऱ्या मकरसंक्रांती सणाला तिळ व गुळाच मोठ महत्त्व आहे. मकरसंक्रातीच्या प्रत्येक घरी एकमेकांना, तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत तिळगुळ वाटण्याची परंपरा आहे. वर्धा जिल्ह्यातही मात्र तिळ व गुळाच्या दरात वाढ झाल्याने आता तिळगुळ घ्या महाग महाग बोला अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी तिळ व गुळात मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली. यामुळे या तिळगुळाची गोडी महागली आहे. सध्या बाजारात तिळाचे तर 160 रुपये किलो तर गुळाचे दर 50 रुपये आहे. गेल्या वर्षी तिळाचे दर 120 रुपये किलो तर गुळ 36 रुपये किलो होता. यंदा तिळात 40 रुपये प्रति किलो तर गुळात 14 रुपयाची दरवाढ झाली आहे. आता या तिळगुळच्या दरवाढीमुळे महिलांचे बजेट बिघडल्याने तिळ गळाचा उठाव कमी झाला असून तिळगुळाचा गोडवा महागला आहे.AM News Developed by Kalavati Technologies