नंदुरबार जिल्ह्यातील सहा पंचायत समितींच्या सभापती पदाचे आरक्षण जाहीर

नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर 16 तारखेला या पंचायत समितीच्या सभापदी पदाची निवड होणार आहे.

नंदुरबार ।  जिल्ह्यातील सहा पंचायत समितींच्या सभापती पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असुन तीन पंचायत समितींवर अनुसुचीत जमाती तर उर्वरीत तीन ठिकाणी अनुसूचीत जमाती महिलांचे आरक्षण आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर 16 तारखेला या पंचायत समितीच्या सभापदी पदाची निवड होणार आहे. त्यामुळे या सोडतीकडे साऱ्यांच्या नजरा होत्या. यातील अक्कलकुवा, अक्राणी आणि शहादा पचायत समितीवर अनुसुचीत जमाती प्रवर्गाच्या महिला राज असणार आहे. तर नंदुरबार नवापुर आणि तळोदा पंचायत समितींवर अनुसुचीत जमातीचे आरक्षण काढण्यात आले आहे. आज अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत जाहीर केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies