दिग्रस तालुक्याला पावसाची हुलकावणी, सरासरी पर्जन्यमान 50% पेक्षा कमी

भूजल पातळी खालावली

यवतमाळ । राज्यात सर्वत्र तीव्र पाऊस बरसत असून पुरामुळे हाहाकार माजला आहे असे असले तरी पण जिल्ह्यातील दिग्रस तालुका याला अपवाद आहे. पावसाळ्याचे तीन महिने उलटून देखील येथे अद्याप पर्यंत सरासरी पातळी पावसाने गाठली नाही. त्यामुळे नैसर्गिक जलस्त्रोतांची साधने कोरडी पडली असून भूजल पातळी ही खोल गेली आहे. त्यामुळे यावर्षी तालुक्याला चांगलीच पाणीटंचाई जाणवेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. पाऊस बसविणारे काळे ढग रोज दाटून येतात परंतु पाऊस मात्र होत नाही. पावसाची हुलकावणी येथील लोकांमध्ये भविष्याची चिंता निर्माण करीत आहे.

तालुक्यामध्ये सरासरी 821.60 मिलिमीटर पर्जन्यवृष्टी होत असते. पावसाळा सुरू झाला तेव्हापासून तर सध्या स्थितीपर्यंत 70 टक्के पर्जन्यमान होणे अपेक्षित आहे. परंतु अद्याप पर्यंत फक्त 45 टक्के पर्जन्यवृष्टी झाली आहे. त्यातही हे शासकीय आकडेवारी आहे. वास्तविक पाहता यावर्षी तालुक्यात तुटक तुटक पाऊस बरसला आहे त्यामुळे कुठे कमी कुठे जास्त अशी स्थिती आहे. सध्या खरीप पिके साधारणपणे बरी आहे. पर्जन्यमानाची हीच स्थिती राहिली तर रब्बी पीक धोक्यात येणार यात काही शंका नाही. कारण की ही पर्जन्यवृष्टी तुटक तुटक झाल्यामुळे. नैसर्गिक जलस्त्रोतांची साधने कोरडीच आहे समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे परिसरातील विहिरी वीस फूट पेक्षा ही जास्त खोल गेली आहे एवढेच नव्हे तर धावंडा आणि अरुणावती या दोन नदीवर असलेल्या अरुणावती धरणाची फक्त 13 टक्के पाणीसाठा आहे. अर्थात अजूनही 87% धरण भरणे बाकी आहे. साधारणपणे 15 सप्टेंबर पासून परतीच्या पावसाला सुरुवात होते. त्यानंतरची पंधरा दिवस पर्जन्य मानाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. असे असले तरी पण एवढा मोठा अनुशेष भरून निघणे कठीण आहे . त्यामुळे तालुक्याच्या चोहिकडे आणि राज्यात सर्वत्र समाधान कारक नव्हेतर अतिवृष्टी होत असताना तालुक्यात मात्र अत्यल्प पाऊस पडला आहे. त्यामुळे आगामी काळात परिसरात सिंचन व्यवस्थेसह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies