रायफल साफ करताना गोळी सुटून जवानाचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

संजय शेट्टीवार हे माओवादविरोधी पथकात तैनात होते.

गडचिरोली | गडचिरोली पोलीस दलातील सिरोंचा QRT येथे नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई संजीव शेट्टीवार (30) यांचा रायफल साफ करताना चुकून गोळी लागून मृत्यू झाला आहे. ते सकाळी आपल्या राहत्या घरी साडे सातच्या सुमारास रायफल साफ करत होते. दरम्यान रायफल मधून गोळी सुटून गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. यावेळी त्याचे कुटुंबीय त्याच्यासोबत घरातच होते. त्यांच्या कुटुंबीयांनी सदर बाब पोलिसांना सांगितली. गडचिरोली पोलीस दल घटनेचा पुढील तपास करत आहेत. संजय शेट्टीवार हे माओवादविरोधी पथकात तैनात होते.

संजय शेट्टीवार गेल्या दोन वर्षांपासून सिरोंचा पोलीस स्टेशनमध्ये शीघ्र कृती पथकात कार्यरत होते. ते आपल्या कुटूंबासह सीआरपीएफ कँम्प परिसरात राहायचे. दरम्यान सकाळी साडे सात वाजता सुमारास शेट्टीवार आपली रायफल साफ करत होते. दरम्यान त्यातून अचानक गोळी सुटूली आणि त्यांच्या त्यांच्या हनुवटीखालून डोक्यात घुसली. गोळी लागताच शेट्टीवर जमिनीवर कोसळले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना सिरोंचा येथील सरकारी रुग्णालयात आणण्यात आले होते. तिथे प्राथमिक उपचार करून वारंगल (तेलंगणा) येथील खासगी रुग्णालयात नेताना वाटेत त्यांचा मृत्यू झाल्याचे सिरोंचा ठाण्याचे निरीक्षक शिवाजी राऊत यांनी सांगितले आहे.AM News Developed by Kalavati Technologies