कोणालाही मुद्दाम आरोपी ठरवणार नाही; पण दुर्लक्ष करणाऱ्यांना सोडणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भंडाऱ्यातील रुग्णालयाची पाहणी केली, असून राज्यातील रुग्णालयाचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहे

भंडारा । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भंडाऱ्यातील रुग्णालयची पाहणी केली. शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगेत 10 बालकांचा मृत्यू झाला. त्या बालकांच्या कुटुंबियांचं मुख्यमंत्र्यांनी सांत्वन केलं. मृत बालकांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाखांची मदत करण्यात येईल. तसेच या घटनेची तात्काळ चौकशी करण्यात येईल. कोणताही मुद्दाम आरोपी ठरवणार नाही, पण दुलर्क्ष करणाऱ्यांना सोडणार नाही. असे मुख्यमंत्री म्हणाले. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या बालकांच्या कुटुंबियांना मी भेटून त्यांचे सांत्वन केले. बालकांचे जीव गेले आहेत कितीही सात्वंन केले तरी ते परत येणार नाही.

दुर्घटनेनंतर जे होतं, ते आधी का होत नाही ? कोरोनाचे संकट राज्यावर आल्याने इतर गोष्टींकडे दुर्लक्ष झाले का? याचीही चौकशी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, यात कोणालाही मुद्दाम आरोपी ठरवले जाणार नाही, मात्र ज्यांनी याकडे दुर्लक्ष केलं ते सुटणार नाही. भंडारा रुग्णालयानंतर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies