मेट्रो कारशेड हलवणे चुकीचे! देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

आरेमधील कारशेड कांजुरला हलवण्यात आले असून, त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचं मत व्यक्त केलं आहे

मुंबई । मुंबईतील आरेमधील मेट्रो कारशेड कांजुरमार्ग येथे हलवण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यावर विरोधकांनी सत्ताधारी सरकारवर विरोध करण्यास सुरूवात केली आहे. भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचा मेट्रो कारशेड हलवण्याचा निर्णय चुकीचा असल्याची टीका केली आहे. यासंबंधी देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक ट्वीट करून मेट्रो कारशेडच्या निर्णयाबद्दल खुलासा केला आहे.

'मेट्रो 3 आणि मेट्रो 6 या दोन मार्गिकांना एकात्मिक करून कांजुरमार्ग येथे कारशेड प्रस्तावित करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संकल्पना त्यांनीच स्थापन केलेल्या तज्ञ समितीने यापूर्वीच नाकारली होती' असा खुलासा फडणवीसांनी केला आहे. दुसऱ्या ट्विट मध्ये फडणवीस म्हणाले की 'मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आरेची जागा हा एकमात्र व्यवहार्य पर्याय होता. आर्थिकदृष्ट्या सुद्धा तो किफायतशीर होता आणि पर्यावरणीय परिणाम कमीत कमी होईल, हा विचार केल्याने तो अधिक शाश्वत पर्याय सुद्धा होता' असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies