जागेच्या वादातून तिवसा येथे मामा मामीची निघृण हत्या

तिवसा येथील मामा-भाचे असलेल्या नातेवाईकांमध्ये जागेच्या वादावरुन भांडण झाले. भांडणाचे रुपांतर हत्येत झाले

यवतमाळ । दारव्हा तालुक्यातील तिवसा येथे घराजवळील नातेवाईकच असलेलया शेजाऱ्यांमध्ये जोरात भांडण होऊन त्यांचे रूपांतर निर्घुण हत्येत झाले. या खुनामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आज दुपारी तीन ते साडेतीन वाजता च्या दरम्यान तिवसा येथील मामा-भाचे असलेल्या नातेवाईकांमध्ये जागेच्या वादावरुन भांडण झाले. भांडणाचे रुपांतर हत्येत झाले. यामध्ये आरोपीचे मामा रघुनाथ जाधव वय पन्नास वर्षे आणि मामी अनुसया जाधव वय 45 वर्ष यांची अतिशय निघृणपणे हत्या करण्यात आली. प्रशांत राठोड वय 28 व किरण राठोड 30 असं या दोघा संख्या भावांचे नाव आहे. आरोपी प्रशांत राठोड व किरण राठोड यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास ठाणेदार कारेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies