धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमी सज्ज, देशभरातून अनुयायांच्या आगमनास सुरवात

संपूर्ण देशातून आणि विदेशातून सुद्धा या ठिकाणी बाबासाहेबांचे अनुयायी येऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात.

नागपूर । 63 व्या धमचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूरची दीक्षाभूमी सज्ज झाली असून देशभरातून आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमीवर पोहचण्यास सुरुवात केली आहे. नागपूरच्या प्रसिद्ध दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 साली बौद्ध धम्माची लाखो अनुयायांसोबत दीक्षा घेतली. तेव्हा पासून नागपुरात धमचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या या सोहळ्यासाठी अनुयायांच्या रांगा लागल्या आहेत.

हा 63 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. या निमिताने या ठिकाणी लाखोच्या संख्यने दरवर्षी अनुयायी येतात. यावर्षी साधारणतः 5 लाख अनुयायी येण्याची शक्यता आहे. नागपूर किंवा विदर्भातूनच नाही तर संपूर्ण देशातून आणि विदेशातून सुद्धा या ठिकाणी बाबासाहेबांचे अनुयायी येऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात. लाखो अनुयायी एकत्र येणार या कारणाने मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबसत ठेवण्यात आला आहे. ठिकठिकाणी CCTV कॅमेरे सुद्धा लावण्यात आले आहेत. या ठिकाणी येणारे अनुयायी मोठ्या श्रद्धेने येतात. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्याने कुठलेही राजकीय नेते धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्याला उपस्थित राहणार नाही. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून थायलंड व म्यानमार येथून बौद्ध भिक्षु उपस्थित राहणार आहेत.AM News Developed by Kalavati Technologies