अबब! नागपूरात गेल्या 24 तासात 2 हजार 205 जणांना कोरोनाची लागण

नागपूरात गेल्या 24 तासात 2 हजार 205 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 43 हजारांच्या पुढे गेला आहे

नागपूर । नागपूरात कोरोनाचा कहर कायम आहे. गेल्या 24 तासात तब्बल 2 हजार 205 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 349 तर शहरी भागातील 1 हजार 854 रुग्णांचा समावेश आहे. तर 34 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. त्यामुळे नागपूरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 43 हजार 237 वर पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यात 11 हजार 377 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर जिल्ह्यात कोरोनामुळे सुमारे 1 हजार 399 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 30 हजार 461 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूरात रोजच हजारोंच्या संख्येने रुग्णवाढ होत असल्याने, नागपूरकरांच्या चिंतेत आणखीणच भर पडली आहे.AM News Developed by Kalavati Technologies