खासगी कार्यालयांनी दिशानिर्देशांचे पालन केले नाही तर गुन्हे दाखल करण्यात येईल - आयुक्त तुकाराम मुंढे

काही ठिकाणी नियमांचे पालन करण्यात येत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

नागपूर | शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन होत नसल्याची बाब प्रशासनाच्या निर्दशनास आली आहे. जर दुकानदार, खासगी कार्यालयांनी दिशानिर्देशांचे पालन केले नाही तर त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता, आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण तसेच साथरोग नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देऊन शहरातील आर्थिक बाबींना चालना देण्याचे कार्य नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत मनपाने स्टॅन्डअलोन प्रकारची बांधकाम साहित्य, हार्डवेअर, होजियरी दुकाने, स्टेशनरी, इलेक्ट्रिकल, संगणक, मोबाईल आणि होम अप्लायंसेस दुरुस्तीची दुकाने अटी व शर्तीवर उघडण्यास 17 मे पासून परवानगी दिली आहे. दुकानदारांनी, आस्थापना प्रमुखांनी सोशल डिस्टनसींग, मास्कचा वापर, परिसर निर्जूंतीकरण करणे, सॅनिटॉझरचा वापर इत्यादी निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असून त्याच अटीवर परवानगी देण्यात आली. परंतु काही ठिकाणी नियमांचे पालन करण्यात येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. जे नियमांचे पालन करणार नाही त्यांच्या विरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.AM News Developed by Kalavati Technologies