शेतकऱ्यांनो सोयाबीन मळणी करताय तर जरा जपुन!

पावसामुळे सोयाबीन गंजीत साप, विंचू, उंदरांचे वास्तव्य

मुंबई । दारव्हा तालुक्यात परतीच्या पावसाने जरा उसंत घेतल्याने ताडपत्री ने झाकून ठेवलेली सोयाबीन गंजी मोकळे करून उन्हामध्ये वाळू घालण्यासाठी व मळणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग आता सुरू झाली आहे. परंतु असे करत असताना शेतकऱ्यांनी आता थोडी सावधानता बाळगणेही गरजेचे झाले आहे. त्याचे कारणही तसेच आहे, गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसापासून बचावासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन सुड्या या ताडपत्रीने शेतात झाकून ठेवल्या होत्या. परंतु पावसाच्या पाण्यापासून जीव वाचविण्यासाठी या झाकलेल्या सोयाबीनच्या सुड्या मध्ये साप, विंचू,उंदीर यांनी आश्रय घेतल्याचे आता दिसून येत आहे असाच काही प्रकार दारव्हा तालुक्यातील कोलवाई या गावात घडला असून मळणीसाठी सोयाबीन सुडी काढत असताना शेतकऱ्याच्या हातात सोयाबीन सुडी सोबतच विषारी नाग जातीचा साप आल्याने भम्बेरी उडाली. दैवं बलवत्तर म्हणून शेतकऱ्याचा जीव वाचला. त्यामुळे पावसाने जरी उसंत घेतली असली तरी सोयाबीन मळणी करताना आता शेतकऱ्यांनी सावधानता बाळगणे गरजेचे असल्याचे मत शेतीतज्ञ व्यक्त करताना दिसत आहे.AM News Developed by Kalavati Technologies