दसऱ्याच्या दिवशीच पती पत्नीची आत्महत्या

मृतदेह गावातील विहिरीत आढळून आला

यवतमाळ । महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे पती पत्नीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले असून मृतक पतीचे नाव फकिरा गणपत पिटलेवाड आणि पत्नी निला फकिरा पिटलेवाड आहे. दोन दिवसापासून फकिरा हा घरी आला नाही म्हणून घरच्यांनी शोध घेतला असता आज फिकीराचा मृत्यूदेह गावातील विहिरीत आढळून आला.

ही वार्ता मृतकाच्या पत्नीला कळताच तिने सुद्धा त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज ऐन दसऱ्याच्या दिवशी दोन्ही पती पत्नी ने आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्यांचे कारण अजून कळू शकले नसून पुढील तपास सुरु आहे.AM News Developed by Kalavati Technologies