पुसद येथे चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांकडून गोळीबार, घरमालक जखमी

घरमालक विठ्ठल जयताभो मेश्राम वय 65 सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या उजव्या हाताच्या दंडाला ईजा झाली

यवतमाळ । पुसद येथील शिवराज पार्कमधे बंद घारात राञी 1.00 वाजता दोन चोरट्यांनी कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. परंतू योगायोगाने याचवेळी घरमालक घरी आल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. सदर चोरट्यानी यावेळी पकडले जाऊ नये म्हणून जवळील बंदुकीतुन बार केले. यात घरमालक विठ्ठल जयताभो मेश्राम वय 65 सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या उजव्या हाताच्या दंडाला ईजा झाली.

पोलीस तपास करीत आहेत. विठठल जैताभो मेश्राम हे सेवनिवृत कर्मचारी आहेत. घटना घडताच लगेच पेट्रोलींग करीत असलेले पोलीस तत्काळ हजर झाले. पोलीस येण्याअगोदर चोरटे पळून गेले होते. अधिक तपास सुरू असून पुसदचे ठाणेदार रत्नपारखी व मसराम हे तपास करीत आहेत. सध्या पुसद शहरात गुन्हेगारी आपले पायमुळे घट्ट करीत असलयाचे ही निदर्शनात येत आहे.AM News Developed by Kalavati Technologies