नमस्कार डेअरीतर्फे सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना 3 लाखाची मदत

नमस्कार टीमने ताबड़तोब 400 टिन बोलावून प्रत्येक घरी 7 टिन याप्रकारे 57 निराधार पारिवाराना मदत केली

यवतमाळ । उमरखेड येथील सुप्रसिद्ध नमस्कार डेअरीतर्फे सूखवाडी ता.पनूस जिल्हा सांगली येथे पुरग्रस्त 57 लोकांच्या घरावरील छता साठी तीन लाख रुपयाची टिन (पत्रे) देण्यात आले. कोल्हापुर जिल्ह्यातील पुरग्रस्ताबद्दल चेदमन संदीप नारायणदास भट्टड व डायरेक्टर निखील श्रीगोपाल भट्टड यानी नमस्कार डेअरी परिवारातील सर्व सदस्याना मदत करण्याचे आव्हान केले. या आव्हानामुळे नमस्कारचे सर्व दुध उत्पादक शेतकरी, दुध संकलन करनारे सर्व संचालक, दुध वाहतुक करनारे सर्व चालक/मालक, नमस्कारचे सर्व कर्मचारी या सर्वानी मिळून 253000 रु यामधे भट्टड परिवाराने चक्क 47000 रु चे योगदान दिले व एकुण तीन लाख रुपये जमा झाले. नमस्कार तर्फे संदीप भट्टड यांनी स्वतः जाऊन सांगली जिल्हयातील पुरग्रस्त भागाचा दौरा केला व जेथे बोट उलटून 19 लोकांचे प्राण गेले. त्या ब्रम्हनाळ गावाजवळ सुखवाड़ी या गावात 57 घरांचे खुप जास्त नुकसान झाल्याचे आढळून आले तेथील लोकांनी संगितले की शैक्षणिक सहित्य व अन्न-वस्त्र याची सोय झाली आहे. आता फक्त निवाराच्या छतासाठी आपन 350 पत्रांची व्यवस्था केली तर आम्ही सूखरुप राहु शकतो. हे एकुण नमस्कार टीमने ताबड़तोब 400 टिन बोलावून प्रत्येक घरी 7 टिन याप्रकारे 57 निराधार पारिवाराना मदत केली. मदत मिळताच सर्व गावकरी मंड़ळीनी नमस्कारला मनापासुन खुप खुप धन्यवाद दिले.AM News Developed by Kalavati Technologies