देवा...! आता तरी पावसाला थांबवा

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपुर येथील बालगोपालांचे गणरायाला सामुहीक साकडे

वर्धा | जिल्ह्यातील अतिवृष्टीने चांगलाच धुमाकूळ घातला असून या पाऊसाच्या धुवांधार बॅटिंगने नागरिकांना सळो की पळो करून सोडले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे शेतातील पिके पाण्याखाली गेल्याने करपू लागल्यामुळे बळीराज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टी नावाच्या जिल्ह्यातील संकटाला आता तरी थांबवा गणराया असे सामृहीक साकडे समुद्रपुरातील शेकडो बालगोपालांनी एकत्रित येऊन संकटमोचन गणरायाला घातले.

या वेळी या बालगोपालांच्या हाकेला हाक मिळवण्यासाठी शेतकरी शेतमजूर व महिला मंडळांनी बाल गणेशोत्सव मंडळाच्या पेण्डालमध्ये एकत्रित झाल्या होत्या. सर्वांनी फक्त गणरायाला देवा हो देवा गणपती देवा म्हणत हे संकटमोचक विध्नहर्ता जिल्हावर आलेल अतिवृष्टीच संकट आता तुम्हीच दुर करा अशी प्रार्थना केली. यावेळी या प्रार्थनेत मोठ्या संख्येने शहरवासी सहभागी झाले होते.AM News Developed by Kalavati Technologies