गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंह कोरोना पॉझिटिव्ह

10 दिवसांच्या वैयक्तिक कामानंतर जिल्ह्यात परतल्यानंतर, दीपक सिंह यांनी कोरोना चाचणी केली असता त्यात ते पॉझिटिव्ह आढळले आहे

गडचिरोली । गडचिरोलीत कोरोनाचा कहर आहे. गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरासह जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंह सुद्धा या कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. त्याची कोरोना चाचणी केली असता त्यात ते पॉझिटिव्ह आले आहे. वैयक्तिक कमासाठी दीपक सिंह दहा दिवसांपासून रजेवर होते. काल जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी(RAT) सायंकाळी करण्यात आली, त्यात ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. उपचारादरम्यान जिल्ह्यातील प्रशासकीय काम ऑनलाइन स्वरूपात सांभाळणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाबाबत कोणत्याही प्रकारची सध्या त्यांना लक्षणे नसुन कुटुंबातील इतर सदस्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies