कर्जाला कंटाळून विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मुत्यू

मुत्यू झालेल्या शेतकऱ्याचे विठ्ठलराव नथ्थु डहाके 65 असे नाव आहे.

यवतमाळ ।  ठाकरे सरकारने 2 लाख रुपये कर्जमाफी घोषणा करूनही वर्धा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची मालिका थांबायची नाव घेत नसुन पुन्हा जिल्ह्यातील अंतरगाव येथील एका शेतकऱ्याने कर्जाला व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. विष प्राशन केलेल्या या शेतकऱ्याने रुग्णालयात उपचारा दरम्यान तीन दिवस मुत्यू झुंज देत शेवटी प्राण त्यागले. मुत्यू झालेल्या शेतकऱ्याचे विठ्ठलराव नथ्थु डहाके 65 असे नाव आहे.

त्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नातलगा कडून सांगण्यात येत आहे. विठ्ठलराव डहाके यांचे कडे स्टेट बँकेच व खाजगी असे साडेतीन लाख रुपये कर्ज असल्याचे सांगण्यात येते आहे. पुढिल तपास गिरड पोलिस ठाण्याचे ठाणेदार महैंद्र सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी करीत आहे.AM News Developed by Kalavati Technologies