राज्याला कर्जाच्या डोंगरात लोटण्याचं काम फडणवीस सरकारने केलं - नितीन राऊत

महाविकास आघाडीचे सरकार विदर्भाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचंही राऊत यावेळी म्हणाले

नागपूर । राज्याला कर्जाच्या डोंगरात लोटण्याचं काम फडणवीस सरकारने केल्याचा आरोप राज्याचे मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी केला. कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर राऊत यांच सोमवारी नागपूरात आगमन झाले. राऊत समर्थक व काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी एकच गर्दी केली होती.

नितीन राऊत यांनी दीक्षाभूमीवर पोहचून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. राज्याच्या तिजोरीवर 4.71 लाख कोटींचा बोजा असून 2 लाख कोटींचा अतिरिक्त बोजा असल्याने राज्याला कर्जाच्या डोंगरात लोटण्याचं काम फडणवीस सरकारने केल्याचा आरोप राऊत यांनी केला. तसेच तीनही पक्षांनी शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन महाविकास आघाडी पूर्ण करणार असेही राऊत यावेळी म्हणाले. गेल्या सरकारमध्ये विदर्भाचे कुठल्याही प्रकारे विकास झाला नसून महाविकास आघाडीचे सरकार विदर्भाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचंही राऊत यावेळी म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies