डॉ. बंग यांच्या शोधग्राम प्रकल्पालाही पावसाचा फटका

जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून पावसाची संततधार सुरू आहे

गडचिरोली | जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील बाराही तालुक्यांमध्ये प्रचंड पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात असलेल्या कठाणी-वैनगंगा-दिना, पोटफोडी आदी सर्व नद्यांनी पात्र सोडल्याने विविध 10 मार्ग बंद झाले आहेत. याचा फटका धानोरा तालुक्यातील डॉक्टर बंग दांपत्याच्या सर्च-शोधग्राम प्रकल्पालाही बसला आहे.

धानोरा तालुक्यातील डॉक्टर बंग दांपत्याच्या सर्च-शोधग्राम प्रकल्पालाही पुराच्या पाण्याने वेढले आहे. या भागात मुसळधार पाऊस पडत असून आसपासच्या गावातील शेततळे व नाले भरून वाहत असल्याने या भागात हे पाणी वेगाने शिरले. दरम्यान, धानोरा शहराला जोडणाऱ्या मुख्य महामार्गावर देखील पाणी असल्याने इथली वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सर्च-शोधग्राम प्रकल्पातील काही इमारतींमध्ये देखील पाणी शिरले असून सध्या कुठललीही हानी झाल्याची वार्ता नसली तरी शोधग्राम प्रकल्पाला पुराचा वेढा कायम असल्याने व्यवस्थापन योग्य ती खबरदारी घेत आहे. याच भागात आदिवासींसाठी असलेले दंतेश्वरी रुग्णालय देखील आहे. ज्यामध्ये जिल्हाभरातून आलेल्या आदिवासी रुग्णांवर उपचार केले जातात.AM News Developed by Kalavati Technologies