हिंगणघाटात व समुद्रपुर तालुक्यात बाहेर गावाहून आलेल्या 132 व्यक्तींची नोंदणी

हिंगणघाट तालुक्यात 101 तर समुद्रपुर 31 दोन्ही तालुक्यात अशा 132 व्यक्तींची नोंदणी करण्यात आली आहे.

वर्धा | कोरानाबाबत आता गावखेड्यातही मोठ्या प्रमाणात जागृती झाली आहे. गावात इतर जिल्ह्यातून कोणतंही व्यक्ती आल्याची माहिती मिळताच गावकरी त्यांच्यापासून दूर राहून याबाबत स्थानिक पातळीवर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना माहिती देत असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे.

वर्धा जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगत जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तीची नोंद घेतल्याचे काम आशा, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांच्याकडून युध्द पातळीवर सुरू आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून येणाऱ्या 2327 लोकांची नोंदणी झाली आहे. यामध्ये, पुणे, मुंबई सोबतच इतर जिल्हे आणि राज्यातून आलेल्या व्यक्तींचा सुद्धा समावेश आहे. 

हिंगणघाट तालुक्यात 101 तर समुद्रपुर 31 दोन्ही तालुक्यात अशा 132 व्यक्तींची नोंदणी करण्यात आली आहे. हिंगणघाटमध्ये कोरोना बाधित देशातून आलेले दोन व्यक्ती असुन या दोन्ही व्यक्तींच्या कोरोना विषाणूच्या चाचण्या निगेटीव्ह आला आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता कोणीही व्यक्ती बाहेर जिल्ह्यातून आला तर स्थानिक नागरिकांना मध्ये मोठी खळबळ निर्माण होताना दिसत आहे.AM News Developed by Kalavati Technologies