मनात कोरोनाची भीती असतानाही शेतकरी शेतमजूरांचे पिक कापणीचे काम सुरू

वर्धा जिल्ह्यातील झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला हरभरा ज्वारी गहु या पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वर्धा | दिवसागणिक कोरोनांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सरकारकडून खबरदारी बाळगत संपूर्ण काल मध्यरात्री देशाला 21 दिवसाच्या लॉक डाऊन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात कोरानाचा संसर्ग रोखण्यासाठी कलम 144 सह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र गावात संचारबंदी असताना व मनात कोरोनाची भीती वाटत असली तरी देखील या देशाचा पोषींदा शेतकरी व त्याचे सहकारी शेतमजूर आपला जिव मुठीत घेऊन कोरोनाची तमान बाळगता सकाळपासून तर सायंकाळपर्यंत शेतात राबत आहे.

वर्धा जिल्ह्यातील झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला हरभरा ज्वारी गहु या पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता यातून वाचलेलं पिक कापणीचा हंगामात जोरात सुरू असताना महाराष्ट्रात कोरोना वायरसने मोठ्या प्रमाणात थैमान घालत आहे. मात्र अशातच तोंडी आलेला घास पुन्हा अवकाळी पाऊस हिरावून घेईल अशी भिती शेतकऱ्यांमध्ये असल्याने शेतमजूरांमध्ये हाताच काम निघून गेल्यावर कसं जगायचं ही भिती असल्याने त्यांच्या समोर कोरोनाची इतकी मोठी दहशत असतांनाही शेतीचे काम करताना दिसत आहे.AM News Developed by Kalavati Technologies