नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या 5 हजार 134 वर, आतापर्यंत 118 जणांचा मृत्यू

गुरुवारी दिवसभरात नागपूरमध्ये तब्बल 342 रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे

नागपूर | जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात तब्बल 342 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉजिटिव्ह आला आहे. एका दिवसातील आतापर्यंतची ही सर्वात जास्त रुग्ण संख्या आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 160 तर शहरी भागातील 182 रुग्णांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूरात कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढतच आहे.

बुधवारी दिवसभरात 305 रुग्णांची नोंद करण्यात आल्यावर गुरुवारी परत एकदा 342 रुग्णांचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. यामुळे नागपुरातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 हजार 134 एवढी झाली आहे. यामध्ये 118 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर आतापर्यंत 3 हजार 294 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत नागपूरात 1 हजार 722 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies