Corona Nagpur : नागपूरात गेल्या 24 तासात 609 कोरोनाबाधितांची भर, तर 29 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात सध्या 7416 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 88,499 एवढा झाला आहे

नागपूर । नागपूरात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 609 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 29 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 88 हजार 499 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 7 हजार 416 जणांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 2 हजार 869 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 78 हजार 214 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आज आढळलेल्या 609 रुग्णांपैकी ग्रामीण भागातील 197 तर शहरी भागातील 403 जणांचा समावेश आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नागपूरात कोरोनाचा उद्रेक कायम असून, शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाने डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता नागपूरकरांच्या चिंतेचा विषय बनला आहे.AM News Developed by Kalavati Technologies