धामणगांव शहरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

धामणगांव शहरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

अमरावती । मागील सहा वर्षापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून अमरावती जिल्ह्य़ात धामणगांव शहर नगर परिषद प्रांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. 6 डिसेम्बर डॉ बाबासाहेब आंबेरकर यांचा 63 वा महापरिनिर्वाण दिन. या दिवशी धामणगाव शहरातील नगर परिषद प्रांगणात सर्व प्रथम बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार व मेणबत्ती लावून आंदराजली देण्यात आली.

आजच्या दिवशी विविध ठिकाणी बाबासाहेब यांच्या कार्यातील तसेच अनुभावातील विचारांमना प्रेरीत करण्यात येत असते. परंतु धामणगाव शहरात बाबासाहेब याना खरी आदरांजली देण्यासाठी दुसर्यांना मदत व्हावी यासाठी मागील 6 वर्षा पासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. या शिबिराचा मुख्य उद्देश हाच असतो. ज्या वेळी गरजूंना रक्ताची आवश्यकता असते. त्या वेळी त्यांना रक्तपुरवठा व्हावा आणि आपल्याकडून सहकार्य व्हावे. तेव्हाच बाबासाहेबांना आपली आदरांजली मिळेल या उद्देशाने धामणगाव शहरातील सर्व मित्र परिवार एकत्र येऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. या कार्यक्रमामुळे समाजात चांगला संदेश जात असून दरवर्षी या कार्यक्रमात मित्रांची गर्दी वाढत असते. यावेळी प्रवीण हेंडवे माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.AM News Developed by Kalavati Technologies