नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात बंद दाराआड चर्चा

राज्याच्या सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

नागपूर । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व संघप्रमुख मोहन भागवत यांच्यात 20 मिनिटं बंदद्वार चर्चा झाली. नागपुरातील सायंटिफिक हॉलमध्ये संघाचे दिवंगत कार्यकर्ते विलास फडणवीस यांच्या स्मृती कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमानंतर तळमजल्यावरील पूर्ती सुपर बाजारच्या एका खोलीत दोन्ही नेत्यांची सुमारे 20 मिनिटे बंदद्वार चर्चा झाली. राज्याच्या सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे व आमदार अनिल सोले हे देखील उपस्थित होते. बाहेर आल्यावर केवळ चहा घेतल्याची माहिती यावेळी गडकरींनी दिली.

कार्यक्रम संपल्यावर दोघांच्याही प्रतिक्रियेसाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी झाली होती. परंतु एकाही दरवाजाने ते बाहेर न पडल्याने सर्वच संभ्रमात पडले. सरसंघचालक व गडकरी दोघेही थेट कार्यक्रमाच्या सभागृहाखालील ‘डिपार्टमेन्टल स्टोअर’मध्ये पोहोचले होते. तेथील कार्यालयात राज्याचे उर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.अनिल सोले, भाजपचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. 10 ते 12 मिनीटे सर्व जण आत होते. त्यानंतर ते बाहेर पडले. आम्ही केवळ चहापानासाठी थांबलो होतो असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भेटीत राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली.AM News Developed by Kalavati Technologies