यवतमाळ | संचारबंदीत बिनधास्त फिरणाऱ्याना नागरिकांना पोलिसांकडून फटके

यवतमाळमधील मारेगावात संचारबंदी लागू असतांना नागरिक बिनधास्तपणे रस्त्यावर फिरत आहेत

यवतमाळ | मारेगाव अवघ्या देशासह राज्यात कोरोना व्हायरसने हाहाकार घातलेला असतांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालपासून राज्यात संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी दरम्यान रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या नागरिकांना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मारेगाव पोलिसांना कोरोनाचे सौम्य फटके मारावे लागत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाय योजना केल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाचा थैमान राज्यात न फैलण्यासाठी संचार बंदी 31 मार्च पर्यंत अंमलात आणल्या गेली असल्याने पोलीस प्रशासन, नगरपंचायत, आरोग्य प्रशासन स्तरावर शहरात वारंवार लाऊड स्पीकरने नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देऊन सुद्धा काही नागरिक या सुचनेचे पालन न करत असल्याने रस्त्यावर मोकाट फिरत असल्याने मारेगाव पोलिसांना नाईलाजाने फटके द्यावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.AM News Developed by Kalavati Technologies