नागपूर शहरात कोरोना सर्वेक्षण होणार नागरिकांनी सहकार्य कराव - आयुक्त तुकाराम मुंढे

सर्व्हेक्षणादरम्यान संपूर्ण नागरिकांची माहिती घेण्यात येणार

नागपूर | नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार नागपुरातील कोरोना बाधित रुग्णांच्या निवसापासून 3 किलोमीटरच्या परिसरात सर्वेक्षण करण्यात आले. यात 64 हजार कुटुंबातील 2 लाख 60 हजार लोकांपर्यंत महापालिकेची चमू पोहचली आहे. ज्यानंतर संपूर्ण नागपूरात कोरोना सर्वेक्षण करण्याचे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले. ‘कोरोना’विषयक जनजागृती आणि शहरातील आरोग्याची माहिती अशा दुहेरी हेतूने हे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. या संपूर्ण सर्व्हेक्षणादरम्यान संपूर्ण नागरिकांची माहिती घेण्यात येणार आहे. आरोग्यविषयक प्रश्न विचारण्यात येणार आहे. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. आपल्या घरापर्यंत येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र राहणार आहेत त्यामुळे त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

नागरिकांकडून माहिती घेतल्यानंतर, ज्या कोणाला आरोग्याचा काही त्रास जाणवत असेल त्यांनी अथवा त्यांच्या कुटुंबीयांना मनपाच्या नियंत्रण कक्षात फोन करून याबाबत माहिती द्यायची आहे. कुणालाही दवाखान्यापर्यंत जाण्याची गरज नाही. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर डॉक्टरांची चमू संबंधित घरापर्यंत जाईल आणि तेथे उपचार देईल. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनानचे पुढील आदेश येईपर्यंत घराबाहेर पडण्याची गरज नाही, असे आवाहनही त्यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे सर्वेक्षण करणारी नागपूर महानगर पालिका पहिलीच महानगर पालिका ठरली आहे हे विशेष.



AM News Developed by Kalavati Technologies