चार वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाची काढली नग्न धिंड

आरोपीला नग्न करून त्याची धिंड काढल्याचा एक व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे

नागपूर । अवघ्या 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगीक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका 35 वर्षीय आरोपीला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. नागरिकांनी आरोपीची नग्न धिंड काढल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हैदराबाद येथील पाशवी बलात्काराची संतापजनक घटना ताजी असताना नागपुर शहरातील पारडी भागात एका नराधमाने 4 वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे करत बलात्काराचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सदर घटना पीडित चिमुकलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड केल्याने अनुचित घटना टळली आहे. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी आरोपीला चोप देऊन त्याची नग्न धिंड काढली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. आरोपीला नग्न करून त्याची धिंड काढल्याचा एक व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे. पारडी विभागातील पुनापूर रोड परिसरात पीडित कुटुंब राहते. पीडित कुटुंबाच्या परिचयात असलेल्या जवाहर बाबुराव वैद्य या इसमाचे त्यांच्या घरी येणे जाणे होते. आरोपी पीडितेच्या घरी येऊन ती एकटी असल्याचे दिसताच त्याने तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. अचानक घरी मुलीची आई पोहचली व आरडाओरड करताच लोक गोळा झाले आणि त्याला बदडून मारत मारत पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies