निसर्गाने तारलं कोरोनाने मारलं; हजारो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून

कोरोनाच्या संकट काळात शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसलेला आहे.

अमरावती | कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाच्या वतीने संचारबंदी लागू करण्यात आली होती. यामध्ये कुठलेही वाहन रस्त्यावर दिसणार नाही असे कडक आदेश देण्यात आले होते. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसलेला आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही घरातच पडून आहे. शासनाच्या वतीने कापूस खरेदी सुरू करण्यात आले असून दररोज 40 ते 50 शेतकऱ्यांचा कापूस मोजण्यात येत आहे. शेतकरी आपला माल विकण्यासाठी शेकडो किलोमीटर अंतर पार करून बाजार समिती पर्यंत पोहोचत आहे. त्यातच चक्रांच्या रांगाच रांगा लागल्याने शेतकऱ्यांना आपला नंबर कधी येईल याची सुद्धा चिंता लागली आहे. घरूनच डब्बा शेतकरी बांधव आपापल्या वाहनाखाली बसून जेवण करत आहेत. जेणेकरून आपला नंबर हा मागे जाणार नाही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

जिल्ह्यातील दर्यापूर बाजार समितीमध्ये एकूण 7500 शेतकऱ्यांना नोंदणी करण्यात आलेली आहे. तर यातील फक्त अकराशे शेतकऱ्यांचा अद्यापही कापूस खरेदी करण्यात आलेला आहे. व 7400 शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे. पुढे एक महिन्याच्या आत पावसाची सुरुवात होणार आहे. सर्व शेतकऱ्यांना पुन्हा शेतीच्या मशागती करता पैशाची अडचण निर्माण होणार आहे. जर शासनाच्या वतीने लवकरात लवकर शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून घेतला तर शेतकर्‍यांना मशागती करिता पुढील अडचण निर्माण होणार नाही. त्यामुळे शासनाने यावर काही उपाय योजना कडून जो कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे तो लवकरात लवकर खरेदी करून घ्यावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies