अकोल्यात आणखी 78 पॉझिटिव्ह रुग्ण; जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1498 वर

यामध्ये अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील 50 पुरुष कैद्यांचा समावेश आहे

अकोला | अकोल्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी झपाट्यानं वाढ होत आहे. आजच्या प्राप्त अहवालात 78 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील 50 पुरुष कैद्यांचा समावेश आहे. तर उर्वरित 28 पैकी यातील 11 महिला तर 17 पुरुष आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 498 इतकी झाली आहे.

दरम्यान आज नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमधील पातूर येथील 7 जण, बाळापूर येथील 7 जण, पोपटखेड ता. अकोट येथील 6 जण, राजदे प्लॉट येथील 2 जण तर उर्वरित अकोट, बार्शी टाकळी, देवी खदान, अशोक नगर, जुने शहर, व्हीएचबी कॉलनी येथील प्रत्येकी 1 - 1 प्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक अशोकनगर येथील 62 वर्षीय पुरुष असून हा रुग्ण दि.26 रोजी दाखल झाला व त्याच दिवशी मयत झाला. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. तर अन्य मयत हा बाळापूर येथील 55 वर्षीय पुरुष असून तो दि.14 रोजी दाखल झाला होता त्याचा काल रात्री मृत्यू झाला.AM News Developed by Kalavati Technologies