जिल्ह्यात संचारबंदी लागू असून सुद्धा नागरिक विनाकारण रस्त्यावर

कायद्याचे पालन करा, पोलीस आयुक्तांचे आदेश

अमरावती | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. काम नसताना कोणीही घराच्या बाहेर निघू नये असे आवाहन केले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झालेला आहे. शासन त्यावर उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र नागरिकांनी सुद्धा याला सहकार्य करावे. असे सांगून सुद्धा अमरावती शहरातील नागरिक संचारबंदी असून सुद्धा विनाकारण घराच्या बाहेर निघत आहे.

पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील विविध चौकामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. प्रत्येक गाड्यांना त्यांनी विनाकारण बाहेर फिरू नये असे सांगण्यात येत आहे. मात्र राज्यात संचारबंदी लागू केली असून सुद्धा याचा कुठलाही प्रभाव नागरिकांमध्ये सद्यस्थितीमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे पोलिसांनी आता कुठलाही विचार न करता जे लोक विनाकारण घराबाहेर फिरत आहे.AM News Developed by Kalavati Technologies