वर्ध्यात 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, सहा नराधम अटकेत

यवतमाळ परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना

वर्धा | नोकरीचे आमिष दाखवून एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना वर्ध्यातील देवळी परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणातील सहा आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. माहितीनुसार पीडित तरुणीला नोकरीचे प्रलोभन दाखवण्यात आले. नोकरी मिळवून देतो असे सांगून तिला देवळीकडे जाणाऱ्या एका फार्म हाऊसवर नेण्यात आले. तेथे सहा जणांनी या तरुणीवर बलात्कार केला.

या घटनेची माहिती सावंगी पोलिसांना मिळाली. सावंगी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून या घटनेतील सहाही नराधमांना बेड्या ठोकल्या असून पीडित मुलीवर सिविल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.AM News Developed by Kalavati Technologies