अखेर एलियन्सचा आवाज आला ऐकू? अमेरिका आणि चीनची उडाली झोप…

अखेर एलियन्सचा आवाज आला ऐकू? अमेरिका आणि चीनची उडाली झोप…

अंतराळातून पृथ्वीवर एलियन्स हल्ला करण्याच्या तयारीत आहेत असा दावा करण्यात आलाय

Mistery audio: ही आता बातमी आहे व्हायरल मेसेजची. अंतराळातून पृथ्वीवर एलियन्स हल्ला करण्याच्या तयारीत आहेत असा दावा करण्यात आलाय. तब्बल 82 तासांत अंतराळातून रहस्यमय सिग्नल्स येत ( fast radio burst) असल्याने शास्त्रज्ञांची झोपच उडाली आहे. खरंच एलियन्स हल्ल्याच्या तयारीत आहेत का.? हे अंतराळातून सिग्नल कसले येतायत ( Signals from space) ? नक्की काय आहे हा प्रकार जाणून घेऊयात या बातमीतून

  • एलियन्स पृथ्वीवर हल्ल्याच्या तयारीत?
  • अंतराळातून 82 तासांत 1863 वेळा रहस्यमय सिग्नल
  • एलियन्सच्या रेडिओ सिग्नलमुळे शास्त्रज्ञांची झोप उडाली

एलियन इज बॅक? एलियन्स पृथ्वीवर येतायत? ते जमिनीवर हल्ल्याचा प्लॅन करतायत? अंतराळातून रहस्यमय सिग्नल येत असल्याने हे एलियन्सचेच असल्याचं बोललं जातंय. शास्त्रज्ञांना सतत अंतराळाच्या एका कोपऱ्यातून सिग्नल मिळतायत. हे सिग्नल 82 तासांत जवळपास 1863 वेळा आले. तएक प्रकारचे नवीन रेडिओ सिग्नल असल्यामुळे शास्त्रज्ञांची झोप उडाली आहे. हे सिग्नल सामान्य फास्ट रेडिओ बर्स्ट पेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे हे नेमके कुणाचे सिग्नल आहेत? एलियन्स हल्ल्याच्या तयारीत तर नाहीत ना? असे अनेक प्रश्न शास्त्रज्ञांना पडले आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञ डोळ्यात अंजन घालून या सिग्नलवर लक्ष ठेवून आहेत.

हे सिग्नल आकाशगंगेतून येत असल्याची माहिती आहे. सिग्नल दर 0.2 सेकंदाला तीन सेकंदांसाठी येतोय. सिग्नलला शास्त्रज्ञांनी FRB 20201124A असं नाव दिलं आहे. चीनच्या फाईव्ह हंड्रेड मीटर अपर्चर स्फेरिकल रेडिओ टेलिस्कोपने पकडले आहेत. चीनमधील खगोलशास्त्रज्ञ हेंग शू या सिग्नलचा अभ्यास करत आहेत.

या सिग्नलनं अमेरिका आणि चीनची झोप उडवलीय. आता या देशांमधील शास्त्रज्ञ या सिग्नलवर अभ्यास करणार आहेत. हे सिग्नल शास्त्राज्ञांपासून सगळ्यांच्या कल्पनापलिकडील रहस्यमयी आवाज आहेत. त्यामुळे एलियन हे जगाशी संपर्क साधत तर नाहीत ना, असा प्रश्न शास्त्रज्ञांना पडला आहे.