‘ठाकरे’ चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात, आज ट्रेलर रिलीज होणारच : संजय राऊत

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास उलगडणारा ‘ठाकरे’ चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात सापडलाय. आज दुपारी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणार आहे. या चित्रपटातील दोन दृश्य आणि तीन संवादांवर सेन्सॉरने आक्षेप घेतला आहे. शिवसेना खासदार आणि चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी ट्रेलर नियोजित वेळेनुसारच प्रदर्शित होईल,  असे स्पष्ट केलं आहे.