राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा भाजपाच्या वाटेवर?

3

नाशिक | काँग्रेसचे नेते आणि विधानससभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा राजकीय वर्तृळात रंगल्या आहेत. सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून काँग्रेसकडून उमेदवारी द्यावी यासाठी राधाकृष्ण विखे पाटील प्रयत्न करत आहेत. मात्र अद्यापही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमधील नगर जागेचा तिढा कायम आहे. यामुळेच सुजय पाटील यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसकडून नसेल तर राष्ट्रवादीकडून का होईना अहमदनगर लोकसभेची जागा डॉ. सुजय विखे यांनाच मिळावी यासाठी हालचालींना वेग आला आहे. जर हे शक्य नसेल तर शिवसेना किंवा भाजपकडून ही उमेदवारी मिळावी यासाठी विखेंनी शिवसेना-भाजपशी देखील संपर्क साधल्याचेही वृत्त आहे. पुढील दोन दिवसात निवडक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

अहमदनगरची जागा आपला सुपुत्र सुजयला द्यावे असे राधाकृष्ण विखे पाटील शरद पवारांना म्हणाले होते. ही जागा काँग्रेस लढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र सर्व वृत्तांना फाटा देत ही जागा राष्ट्रवादीचीच असून संभ्रमावस्था निर्माण करू नका, असे अजित पवार यांनी म्हणाले होते. यानंतर मात्र, सुजय भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.