नाणार प्रकल्प : सुकथनकर समितीने गुंडाळला गाशा, पहिल्याच दिवशी थांबवले कामकाज

file pic

समितीच बेकायदेशीर असल्याचा आरोप

रत्नगिरी | नाणार प्रकल्पासाठी नेमलेल्या सुकथनकर समितीला पहिल्याच दिवशी गाशा गुंडाळावा लागलाय. प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधण्यासाठी 2 दिवसांसाठी सुकथनकर समिती रत्नागिरीत आली होती. या समितीसमोर प्रकल्पविरोधी संघटना, प्रकल्पग्रस्त तसेच शिवसेना यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने समितीने रत्नागिरीतून काढता पाय घेतला. रिफायनरी कंपनीनेच समिती नेमल्यामुळे ही समितीच बेकायदेशीर आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. तसंच प्रकल्पग्रस्तांनीही या समितीला विरोध दर्शवला. यामुळे समिती कामकाज थांबवत असल्याचं समितीचे अध्यक्ष द. म. सुखथनकर यांनी जाहीर केले.