‘जे जे विकासाच्या आडवे येतील, त्यांना बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकून देऊ’ : पंकजा मुंडे

190

बीड | महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आक्रमक भाषणशैलीसाठी ओळखल्या जातात. बीडमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान, बोलताना पंकजांनी याच शैलीत विरोधकांना चांगलाच इशारा दिलाय. जिल्ह्याच्या विकासासाठी ‘जे जे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आडवे येतील, त्यांना बाटलीत बंद करुन मुंबईच्या अरबी समुद्रात फेकून दिलं जाईल’, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधलाय.

एक महिला जेव्हा राजकारणात येते तेव्हा काही लोकांना बाटलीत बंद ठेवायची गरज असते. तर, काहींना बाटलीतून बाहेर काढायची गरज असते. आता, एक महिला व बालकल्याणमंत्री म्हणून मला ते चांगल समजतंय, असंही त्या म्हणाल्या. शहरातील नगरपरिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या 400 कोटी रुपयांच्या विविध योजना शुभारंभ आणि विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी खा. प्रीतम मुंडे, नगराध्यक्ष डॉ. भारत भूषण क्षीरसागर, आमदार जयदत्त क्षीरसागर, आमदार सुरेश धस, आमदार विक्रम काळे, आर.टी. देशमुख, आमदार भीमराव धोंडे, माजी.आ. बदामराव पंडीत, यांची प्रमुख उपस्थिती होती.